गायीची निवड ,गाभण गायीची काळज़ी

आकर्षक व्यक्तिमत्व,जोम शरीराचे निरनिराळे भाग एकमेकांशी सुसंबद्धपणे निगडित झालेले ,छाप पाडणारा आकर्षक चालणे याशिवाय हाडे अंगावरील स्नायु बळकट आणी रेखीव असावेत.गायीचे डोके मध्यम लांबीचे ,मजबूत व नाकपुडया मोठया व ओठ मजबूत असावेत .

आकर्षक व्यक्तिमत्व,जोम शरीराचे निरनिराळे भाग एकमेकांशी सुसंबद्धपणे निगडित झालेले ,छाप पाडणारा आकर्षक चालणे याशिवाय हाडे अंगावरील स्नायु बळकट आणी रेखीव असावेत.गायीचे डोके मध्यम लांबीचे ,मजबूत व नाकपुडया मोठया व ओठ मजबूत असावेत . गायीचा जबडा मजबूत असावा या सर्व गोष्टी गायीची मजबूत अंगकाठी ,अधिक चारा चावून खाण्याच्या शक्तीचे व क्षमतेचे निदर्शक असतात . पाणीदार ,टपोरे असलेले डोळे ,उत्तम आरोग्य व दुधाळ गायींकरीता आवश्यक असण्याऱ्या मवाळ स्वभावाची लक्षणे आहेत . कपाळ काहीसे खोलगट व नाक सरळ असावे . कान मध्यम आकाराचे दर्शवणारे असावेत. मान लांब व बारीक व डोक्यास व .खांध्यास नैेसर्गिकपणे जुळलेली असावीत. घसा व पीळ रेखीव असावे.